Avis Institute of Retail Management

 " त्वरित नोकरीच्या संधीसाठी अेविसचा रिटेल मॅनेजमेंट कोर्स "


सोलापुरातील सुप्रसिद्ध संस्था अेविस कॉम्प्युटर्समध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सहयोगाने अेविस इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटची सुरुवात झाली आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये रिटेल क्षेत्राशी निगडीत विविध शासनमान्य कोर्सेस शिकवले जातात. सर्टिफिकेट कोर्स इन रिटेल मॅनेजमेंट हा कोर्स केल्यावर लहान-मोठ्या शहरात विविध‌ मॉल्स डिपार्टमेंटल स्टोअर्स, सुपर मार्केट,ऑनलाइन स्टोअर्स, शोरूम्स येथे त्वरित नोकरी मिळू शकते. केवळ तीन महिने कालावधीचा हा कोर्स अेविसमध्ये येऊन अथवा आपल्या घरी बसून मोबाईलवर देखील पूर्ण करता येईल. कोर्स पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळते. रिटेल मॅनेजमेंट कोर्ससोबत अतिरिक्त शुल्क भरून जॉब रेडिनेस कोर्स केल्यावर महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून आपल्याला नोकरी शोधून दिली जाते. नोकरीचे किमान ३ कॉल आपल्याला दिले जातील. यामुळे कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरी मिळण्याची मोठी संधी निर्माण होते. तसेच व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी या कोर्सचा उपयोग होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना, सध्या नोकरीत असलेल्यांना, मॅनेजमेंट व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना देखील हे प्रशिक्षण उपयुक्त आहे. या क्षेत्रातील हा पहिला व एकमेव शासनमान्य कोर्स आहे. या कोर्सच्या अभ्यासक्रमात डी मार्ट वॉलमार्ट बिग बाजारया क्षेत्रातील हा पहिला व एकमेव शासनमान्य कोर्स आहे या कोर्सच्या अभ्यासक्रमात डी मार्ट, वॉलमार्ट, बिग-बझार, IKEA, कॉटनकिंग, होंडा, टाटा, फ्लिपकार्ट, कोकोकोला, नेटफ्लिक्स यासारख्या रिटेल कंपन्यांच्या केस-स्टडीज विद्यार्थ्यांना अनुभवायच्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान प्राप्त होणार आहे व नोकरी मिळवणे सोपे जाणार आहे. या क्षेत्रात स्टोअर असोसिएट, टीम लीडर, रिटेल स्टोअर ऑपरेटर, रिटेल सेल्स असोसिएट, रिटेल शिफ्ट सुपरवायझर, रिटेल कॅशियर इन्व्हेंटरी असिस्टंट/ मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, स्टोअर सुपरवायझर, असिस्टंट सुपरवायझर, डिपार्टमेंट मॅनेजर,असिस्टंट स्टोअर मॅनेजर, वेअर हाऊस असिस्टंट/मॅनेजर इत्यादी अनेक प्रकारचे जॉब रोल असतात.

मोठमोठ्या कंपन्या सध्या रिटेल व्यापारात उतरत आहेत. ग्राहकांना अतिशय स्वस्त, सुलभ व थेट सेवा उपलब्ध करून देत आहेत. यामुळे या क्षेत्रात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. यासाठी अेविसमध्ये शास्त्रशुद्ध रिटेल मॅनेजमेंटचे ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. मोबाईल व इंटरनेट क्रांती व वाढती संगणक साक्षरता यामुळे ई-कॉमर्स रिटेल देखील झपाट्याने वाढत आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या सध्या आघाडीच्या कंपन्या आहेत. इथे देखील खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आहे. शासनाने देखील रिटेल क्षेत्राची वाढ पाहून व भारतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार व समृद्धी मिळवून देण्यासाठी सिंगल बँड रिटेल मध्ये १००% व मल्टी-बँड रिटेल क्षेत्रात ५१% थेट परकीय गुंतवणुकीची परवानगी दिली आहे. करोडो स्थानिकांना यामुळे रोजगार मिळणार आहे. नोकरीच्या विश्वात रिटेल क्षेत्र आघाडीवर आहे. सध्या १४ कोटींहून अधिक स्किल्ड, सेमी-सिक्ल्ड, अनस्किल्ड मनुष्यबळ या क्षेत्रात कार्य करत आहे. येत्या ५ वर्षात जगात सर्वाधिक नोकरीची संधी भारतीय रिटेल बाजारात असेल. अेविस मध्ये येऊन अचूक ज्ञान व कौशल्य प्राप्त केल्यास ग्लॅमर्स व मोठ्या पगाराचे जॉब लाखोंच्या संख्येने उपलब्ध आहेत.

 कोर्सच्या अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आजच विजापूर रोडवरील अेविस कॉम्प्युटर्सला भेट देऊन या कोर्सचे तपशीलवार प्रेझेंटेशन मिळवा. मोफत ट्रायल घ्या मग प्रवेश निश्चित करा. अेविस कॉम्प्युटर्स  ही गेली ३१ वर्षे कार्य करणारी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची सर्वात मोठी मॉडेल सेंटर संस्था आहे.

- अविनाश मठपती

संपर्क - 9370732180

Comments

No comments:

Post a Comment